farmer narayngav 
पुणे

आयडियाची कल्पना, या उपक्रमामुळे टळले शेतकऱ्यांचे नुकसान 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नाशवंत भाजीपाल्याचा किमान भांडवली खर्च वसूल व्हावा, या उद्देशाने जुन्नर तालुक्यतील विविध संस्थांच्या मदतीतून परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी केला जात आहे. खरेदी केलेल्या सात प्रकारच्या सुमारे दहा टन भाजीपाल्याचे वाटप आठवड्यातून एकदा स्थानिक १३०० कुटुंबांना घरपोच केला जात आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान टळण्यास मदत झाली आहे. 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व येडगाव परिसरातून रोज सुमारे दोनशे जीपमधून भाजीपाला मुंबई, पुणे व नाशिक बाजारपेठेत विक्रीसाठी रवाना होत होता. कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे शहरात भाजीपाला घेऊन जाणारे चालक, मालक व क्‍लीनर यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला. कोरोनाच्या भीतीमुळे मागील चार दिवसांपासून भाजीपाल्याची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी येडगाव येथील माजी सरपंच गुलाबराव नेहरकर यांच्या पुढाकारातून विविध संस्थांच्या सहभागातून भाजीपाला खरेदीचा निर्णय घेतला आहे. येडगाव ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी परिसरातील तेराशे कुटुंबीयांना या भाजीपाल्याचे घरपोच वाटप करण्यात आले. 

आठवड्यातून एकदा हा उपक्रम राबवण्यात येणार असून, या पुढे ना नफा ना तोटा या तत्त्वानुसार तेराशे कटुंबाना भाजीपाला घरपोच दिला जाणार आहे. या मुळे ग्राहकांना ताजा, दर्जेदार भाजीपाला कमी किमतीत घरपोच उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास हातभार लागणार आहे. सरपंच नरेश नेहरकर, उपसरपंच नयना काशीद, दिनेश जोरे, राजेंद्र गावडे हे पदाधिकारी भाजीपाला खरेदी-वाटप आदींचे नियोजन करत आहेत. 

येडगाव ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, येडेश्‍वर व जयहिंद पतसंस्था या संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर येडगाव परिसरातील शेतकऱ्यांचा सात प्रकारचा एक लाख तीस हजार रुपयांचा भाजीपाला खरेदी केला. भाजीपाल्याचे पॅकिंग, ग्रेडिंग करूण सात प्रकारच्या भाजीपाल्याचे बॉक्‍स तयार करण्यात आले. आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शनिवारी भाजीपाला वितरणाला सुरुवात करण्यात आली. 
- गुलाबराव नेहरकर, 
माजी सरपंच, येडगाव (ता. जुन्नर) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT